Xiaomi चा 108MP कॅमेरा स्मार्टफोन हिंदुस्थानात आज होणार लॉन्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात शुक्रवारी Mi 10 लॉन्च होणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे बर्‍याच विलंबानंतर Xiaomi शुक्रवारी अखेर ऑनलाइन कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Mi 10 चीनमध्ये यापूर्वीच लॉन्च करण्यात आला आहे. तसेच काही आंतरराष्ट्रीय बाजारातही याची लॉन्चिंग करण्यात आली आहे. कंपनी आता याला हिंदुस्थानी बाजारपेठेत सादर करणार आहे. याची खास गोष्ट अशी की यात फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह 108MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Mi 10 लॉन्च इव्हेंट शुक्रवारी दुपारी 12 वाजता होईल. जो तुम्हाला यूट्यूबवर लाईव्ह पाहता येईल. Xiaomi च्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवर तुम्ही हा इव्हेंट पाहू शकता. Mi 10 सोबतच Mi True Wireless Earphones 2 आणि Mi Box देखील लॉन्च केले जाणार आहे. जे ग्राहक Mi 10 ची प्री-बुकिंग करतील त्यांना 2,499 रुपयांचा Mi Wireless Powerbank मोफत मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये CNY 3,999 ( 42,800 रुपये ) इतकी आहे. हिंदुस्थानात याची किंमत किती असेल, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Mi 10 मध्ये होल-पंच डिस्प्ले, क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर आधारित एमआययूआय 11 वर चालतो. यात 12 जीबी रॅमसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आले आहे. याच प्रायमरी कॅमेरा 108 एमपीचा आहे आणि यात 4,780mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.