
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची तब्येत सुधारली आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला आहे. सिंह यांना एम्समध्ये कार्डियो थोरासिक वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. डॉक्टर त्यांच्यावर निगराणी ठेवून होते. सध्या त्यांची तब्येत चांगली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या छातीत दुखू लागल्याने रविवारी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. दिल्ली एम्सने मेडिकल बुलेटिन जारी करत म्हटले होते की त्यांना डॉ. सिंह यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप आला होता. त्यांना कोणत्या कारणामुळे ताप आला होता याचा तपास डॉक्टर करत आहेत.
डॉ.सिंह यांच्यावर २४ तासांहून अधिक वेळ एम्समध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची मेडिकल तपासणी केली असता प्रकृती चांगली असल्याचे कळाले, म्हणून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

























































