चौथ्या दिवशीही परभणीतून 121 परप्रांतीय मजुरांची स्वगृही रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश राज्यातील 121 मजूर परभणी जिल्ह्यातील विविध भागात लॉक डाऊन मुळे अडकले होते. गुरूवारी या सर्व मजुरांना  जिल्ह्यातील 5 बसद्वारे संभाजीनगर रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे योग्य ते पालन संबंधितांद्वारे करण्यात आले.  उत्तर प्रदेश राज्यातील 121 मजुरांना संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकापर्यंत  एकूण 5 एसटी महामंडळाच्या बसेस द्वारे आज रवाना करण्यात आले,अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.