किल्लारी परिसरात वादळीवारे विजेच्या कडकडाटासह पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील किल्लारीसह परिसरात दुपारी दोन वाजल्यापासुन वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस व विजेचा कडकडाट चालु होता. त्यामध्ये किल्लारी भाग 2 येथे अवकाळी पावसामुळे गावामध्ये व शेतात खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये अंगणवाडी क्र.17 चे पत्रे उडून दूरवर जाऊन पडले.

आतील लहान मुलांचे शैक्षणिक साहित्याचे खूपच नुकसान होऊन हजारोचे नुकसान झाले. तसेच गावातील घरावरील व किराणा दुकानावरील पत्रे उडून गेले. घरावर झाडे उमडून पडले व तसेच संजय चितकोटे यांच्या शेतात त्यांची गाय वीज पडल्यामुळे मरण पावली आहे. राम जिडगे याच्या किराणा दुकानावरील पत्रे, संतोष भोसले, अभिमन्यु सोनटक्के यांच्या घरावरील पत्रे उडाले. अल्ली टप्पेवाले यांच्या घरासमोरील झाड कोसळून म्हैस गंभीर जखमी यामुळे हजारोंचे नुकसान झाले.