
लातूर जिल्ह्यातील उदगीर उपजिल्हा रुग्णालय येथून एकूण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते, त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच 3 व्यक्तींच्या अहवालांची रविवारी पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 16 मे रोजी एकुण 96 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते व त्या सर्वच 7 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
रेणापूर येथील 1 व्यक्तीच्या स्वॅबची तापसणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एकूण 12 पॉझिटिव्ह, 78 निगेटिव्ह, 5 पुनर्तपासणी व 1 रिजेक्ट अहवाल आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 16 मे रोजी सकाळी 8 ते दु 4पर्यंत कोरोना (कोविड-19) बाह्यरुग्ण विभागात एकुण 190 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकुण 8391 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण 313 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 304 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 4 मे रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे.
आजपर्यंत 222 व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी समाप्त झाला असुन एकुण 82 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाईनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.



























































