हिंगोली तालुक्यात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली तालुक्यातील भीरडा या गावात मुंबईहून आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 100 झाली असून त्यापैकी 85 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भीरडा हे गाव प्रशासनाने सील केले आहे.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात मुंबई, पुणे, संभाजीनगर व अन्य मोठ्या शहरामध्ये कामानिमित्त असलेले नागरिक स्वगृही परतत आहेत. जिल्ह्यात 18 मेपर्यंत 17 हजार नागरिक परत आले आहेत. हिंगोली तालुक्यातील भीरडा या गावामध्ये मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या वसमत तालुक्यातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 100 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 85 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये 78 एसआरपी जवानांचा समावेश आहे. तर सहा एसआरपीएफ जवानांवर संभाजीनगर येथे उपचार सुरू असून वसमतच्या कोविड केअर सेंटरमध्ये आठ जणांवर आणि हिंगोलीत एकावर उपचार सुरू आहेत. सध्या उपचार सुरू असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 15 आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे व डीवायएसपी रामेश्वर वैंजणे यांनी भिरडा गावात भेट देऊन संपूर्ण गाव सील केले आहे. तसेच आरोग्य विभागाच्या पथकानेही गावाला भेट दिली.