पालिकेच्या डॅशबोर्डमुळे रुग्णालये, खाटांची माहिती मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत किती रुग्णालयांत कोरोनावर उपचार चालतात, कुठल्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती पालिकेने सुरू केलेल्या डॅशबोर्डमुळे मिळणार आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पालिकेतील या डॅशबोर्ड कार्यप्रणालीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या.

कोरोना रुग्णांना तातडीने आरोग्य सुविधा मिळण्यासाठी डॅश बोर्ड सुरू करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती. कोरोनोची स्थिती नियंत्रणात आणणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संजीव जयस्वाल यांना निवेदनही दिले. खासगी रुग्णालयातील परिचारिकांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यामुळे पालिकेने तातडीने कार्यवाही करावी असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार राहुल नार्वेकर, पालिकेचे भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट उपस्थित होते.