
परभणी जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 82 झाली आहे.
नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला दोन रुग्णांचा कोरोना अहवाल रविवारी सायंकाळी 7 वाजता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. शहरातील त्रिमुर्ती नगर, मातोश्री नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. त्रिमुर्ती नगरातील कोरोना बाधीत रुग्णाचे वय 2 वर्षे असून मातोश्री नगरातील रुग्णाचे वय 16 वर्षे आहे. रविवारी 113 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये दोघेजण पॉझिटीव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी दिली.
सदरील रुग्ण कोणाच्या संपर्कात आले आहेत. याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून रविवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 82 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाला. सध्या 79 रुग्णांवर उपचार सरु आहेत.

























































