
धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे शतक झाले असून आज दहा रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 104 झाली आहे. यातील 46 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 55 रुग्णांवर उपचार सुरु असून तीन रुग्णांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे जीव गेला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून 74 स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून 63 रिपोर्ट निगेटीव्ह तर दहा रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. एका स्वॅबचा रिपोर्ट अनिर्णित आला आहे.
आज आलेल्या दहा पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सात रुग्ण धाराशिव शहरातील काकानगर, उस्मानपुरा येथील असून हे सर्व पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. दोन रुग्ण कळंब तालुक्यातील शिराढोण येथील आहेत व एक रुग्ण भूम तालुक्यातील सोन्नेवाडी येथील असून दहा दिवसांपूर्वी घाटकोपर मुंबई येथून आलेला आहे. धाराशिव शहरात आज नवीन सात रुग्ण आढळून आल्याने शहरातील कोरोना रुग्णाची संख्या आता 23 झाली आहे.
‘मिशन बिगिन अगेन’बाबत जारी केलेल्या नियमात बदल, ‘या’ गोष्टी होणार सुरू, ‘या’ वर बंदी कायम
उमरगा तालुक्यातील 16, लोहारा 6 व परांडा या तालुक्यात 11 रुग्ण सापडले असून कळंब तालुक्यात 21 रुग्ण सापडले आहेत तर भूम तालुका 3, वाशी तालुका 4 व धाराशिव 39, तुळजापूर येथे 4 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
चांगली बातमी – कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या ‘अँटिबॉडी’ पासून औषध तयार करण्यात यश

























































