हे तर फारच झालं! नेपाळही गोळीबार करू लागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजवर हिंदुस्थानचा मित्र असलेला नेपाळ ही आता गुरगुरायला लागलेला आहे. शुक्रवारी तर फारच झालं. नेपाळ सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी थेट सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला यात बिहारमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. पाकिस्तान कडून जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ले, सीमेवर गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. चीन कडूनही कुरापती सुरूच आहेत पण आजवर नेपाळने थेट गोळीबार केला नव्हता.

बिहारचा सीतामढी जिल्हा हिंदुस्थान नेपाळ सीमेजवळ आहे. या जिल्ह्यातील लाल बंदी सीमाभागात सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी नेपाळच्या सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांनी बेछूट गोळीबार केला. शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जात असताना हा गोळीबार करण्यात आला. त्यात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी जखमींची संख्याही चार असल्याचे म्हटले आहे