लॉकडाऊनमधील चमत्कार; रिलायन्स इंडस्ट्री डेडलाईनच्या आधी कर्जमुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीत जगभरातील कंपन्या अडचणींचा सामना करत असताना मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) 1.68 लाख कोटी रुपये कमवले आहेत, तेही अवघ्या 58 दिवसांत. त्यामुळे मुकेश अंबानी यांची कंपनी डेडलाईनच्या आधी कर्जमुक्त झाली आहे. इतक्या कमी वेळात जागतिक स्तरावर इतकी मोठी रक्कम जमवणे हा रेकॉर्ड आहे. हिंदुस्थानच्या कॉर्पोरेट इतिहासात हे अभूतपूर्क आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने रेकॉर्ड कायम करताना 58 दिवसांच्या छोट्याशा कालावधीत 1.68 लाख कोटी रुपये जमवले आहेत. या कालावधीत रिलायन्सच्या सब्सिडरी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये जगभरातल्या गुंतवणूकदारांकडून 1,15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर रिलायन्सने राइट्स इश्यूच्या माध्यमातून 53,124.20 कोटी रुपये जमवले.

  • पेट्रोल-रिटेल क्षेत्रात बीपीसोबत जॉईंट वेंचरची प्रक्रिया पूर्ण झाल्याने एकूण 1,75 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
  • 31 मार्च 2020 ला कंपनीचे एकूण कर्ज 1,61 लाख कोटी रुपये इतके होते. गुंतकणूक आणि राईट्स इश्यूनंतर कंपनी कर्जमुक्त झाली आहे.

महत्त्वकांक्षी विकासाचे लक्ष्य

मुकेश अंबानी म्हणाले, या यशानंतर मुकेश अंबानी म्हणाले, 31 मार्च 2021 या निर्धारित लक्ष्याआधी रिलायन्सला कर्जमुक्त करण्याचा शेअरधारकांना दिलेला शब्द पूर्ण केल्यानंतर मी आज खुश आहे. रिलायन्स कंपनी कर्जमुक्त झाल्याच्या या प्रसंगी मी सगळ्यांना आश्कासन देतो की येत्या दशकात रिलायन्स आणखी महत्त्काकाक्षी विकासाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवेल आणि ते पूर्ण करेल. काही आठकडय़ांपासून जिओमध्ये जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही खरंच आनंदित झाले.