
रत्नागिरीत आणखी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 493 झाली आहे. कोरोनाबाधित दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 23 वर पोहचला आहे.
पॉझिटिव्ह सापडलेल्या रूग्णांमध्ये दापोली तालुक्यातील आडे, दाभोळ संगमेश्वर तालुक्यातील कडवई, अंधेरी, कारभाटले तिवरेवाडी, लांजा तालुक्यातील इसवली, रत्नागिरीतील निवळीफाटा हातखंबा येथील रूग्णाचा समावेश आहे. जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बहादूरशेख नाका चिपळूण येथील 72 वर्षीय पुरुष रुग्ण तसेच शिवतर ता. खेड येथील 44 वर्षीय पुरुष रुग्ण यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांना मुंबईतून रत्नागिरीत आले होते.



























































