शहीद सुनील काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या पुलवामा भागातील बांदझू परिसरात मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिह्यातील बार्शी तालुक्यातल्या पानगावचे सुपुत्र, जवान सुनील काळे शहीद झाले. शहीद सुनील यांच्यामागे पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

शहीद सुनिल काळे यांच्या मुलांच्या पीजी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून करणार असल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.