आधी 5 बहिणी बुडाल्या नंतर 4 भाऊ बुडाले, एका दिवसांत 9 जणांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drowned

भोकरदन येथे 5 बहिणींचा बुडून मृत्यू झाल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे शेततळ्यात बुडून चार सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरबाज सलीम शेख (21), फैजल सलीम शेख (19), दानेश सलीम शेख (14) आणि नवजीश सलीम शेख (12) अशी चौघांची नावे आहेत. मंगळवारी ही घटना उघडकीस आल्यावर शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबुर्डी येथील कैलास पोपट शिर्के यांच्या ऊसाच्या गुऱ्हाळावर काही परप्रांतीय कुटुंबे कामाला होती. बाबुर्डी शेजारी असणाऱ्या म्हातारपिंप्री गावातल्या दत्तात्रय विनायक शिर्क यांच्या हद्दीतील शेततळ्यात चौघे तरुण दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेली होती. शेततळे अर्धे भरलेले असल्याने पाणी खोल होते.

सुरुवातीला तीन भाऊ पाण्यात पाईपला धरून उतरले, मात्र भार सहन झाला नसल्याने पाईप निसटला. तीन भाऊ पाण्यात पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी चौथा मोठा भाऊ पाण्यात उतरला. मात्र त्यालाही पोहता येत नसल्याने आणि प्लॅस्टिक कागद निसरडा असल्याने त्यांना अंदाज आला नाही व पोहता येत नसल्याने या तरुणांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.