Corona – रशियानंतर ब्रिटनमधून आली खुशखबर, अति गंभीर रुग्णांसाठी ‘हे’ औषध ठरणार गेमचेंजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाने कोरोनावरील पहिली लस तयार केल्यानंतर आणि हिंदुस्थानमध्ये लसीची मानवी चाचणी सुरू झाल्यानंतर आता ब्रिटनमधून एक खुशखबर आली आहे. ‘डेक्सामेथासोन स्टेरॉयड’ या औषधाच्या चाचणीचा अंतिम अहवाल समोर आला आहे. या औषधामुळे कोरोना संक्रमित रुग्णाच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे उघड झाले आहे. ‘न्यू इंग्लैंड जर्नल ऑफ मेडिसिन’ने शुक्रवारी हा अहवाल प्रसिध्द केला.

कोरोना विषाणूशी संपूर्ण जग झुंज देत असताना ब्रिटनमध्ये डेक्सामेथासोन औषधाची चाचणी घेण्यात आली. अति गंभीर रुग्णांवर देखील या औषधाचा प्रभावी गुण दिसून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अक्षरशः व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोविड-19 संक्रमित रुग्णाच्या तब्येतीतही यामुळे सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र पहिल्या स्टेजमध्ये असणाऱ्या रुग्णांना हे औषध देण्यात येऊ नये असेही अहवालात म्हटले आहे. यामुळे रुग्णाच्या आरोग्याला धोका संभवतो.

Corona vaccine – देशात मानवी चाचणीस सुरूवात, स्वयंसेवकांना दिला डोज; परिणाम आश्चर्यकारक

डेक्सामेथासोन औषधाच्या चाचणीसाठी 2 हजार 104 कोविड-19 संक्रमित रूग्णांची निवड करण्यात आली होती. या रुग्णांना जवळपास 10 दिवस रोज या औषधाचा 6 मिलिग्राम डोज देण्यात आला, तर 4 हजार 321 रुग्णांना सामान्य केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले. चार आठवड्यानंतर या रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा दिसून आली. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या रुग्णांचा मृत्यूदर या औषधामुळे 36 टक्क्यांनी कमी झाला असे संशोधकांच्या निदर्शनास आले. तसेच व्हेंटिलेटर किंवा ऑक्सीजनचा वापर न करणाऱ्या रुग्णांवर या औषधाचा प्रभाव जास्त दिसून आला नाही, असेही निदर्शनास आले.

गुड न्यूज – मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशिया ‘या’ तारखेला कोरोनावरील पहिली लस करणार लॉन्च