जागतिक तापमानवाढीमुळे शास्त्रज्ञांची वाढली चिंता; सायबेरियातील तापमानात 600 पटींनी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायबेरिया हा जगातील सर्वात थंड प्रदेशांपैकी एक आहे. मात्र यावर्षी या प्रदेशात उष्णतेने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. ही उष्णतेची लाट हवामान बदलाच्या धोकादायक परिणाम स्पष्टपणे दर्शवित आहे. यामुळे सायबेरियात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. सायबेरियात आतापर्यंत उष्णतेत 600 पट वाढ झाली आहे.

19_07_2020-04_02_2020-ice-age-global-warming_19999899_20528979

वातावरणातील या बदलामागील कारण शोधण्यासाठी रशिया, फ्रान्स, नेदरलँड्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या शास्त्रज्ञांनी 70 वेगवेगळ्या मॉडेल्सचा उपयोग केला आहे. तसेच कोळसा, तेल, गॅस यासारख्या वस्तूंचा अधिक वापर केला नसता तर जागतिक तापमानवाढीवर याचा काही परिणाम झाला नसता का, याच उत्तर शोधण्याचे काम शास्त्रज्ञ करत आहेत. या शोधातून त्यांना आढळले की, हवामानातील बदलामुळे सायबेरियाचे वातावरण इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. असे 80 हजार वर्षांत एकदा होते. या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि ब्रिटनच्या हवामान खात्याचे शास्त्रज्ञ अँड्र्यू सिआवरेला म्हणाले आहे की, ‘असे मानवी हस्तक्षेपाशिवाय घडले नसते.’

याबद्दल बोलताना ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या पर्यावरण बदल संस्थेचे संचालक फ्रेडरीक ऑटो म्हणाले, संशोधकांनी बर्‍याच प्रदेशात संशोधन केले, मात्र 2020 मध्ये सायबेरिया सारखी परिस्थिती दुसरीकडे कुठेही आढळली नाही. सायबेरियात वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सरासरी तपमान संशोधकांनी नोंदवले आहे. त्यांना तापमान सामान्यपेक्षा 9 अंशांपेक्षा जास्त असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे, जूनमध्ये रशियन शहर वेरखोयान्स्क येथेही तापमानात वाढ दिसून आली. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अधिक इंधन जाळल्यामुळे त्यातून निघणाऱ्या गॅस आणि इतर अशा घटकांमुळे वातावरणात असे बदल होऊन तापमानात वाढ झाली आहे.