मल्लखांबच्या ऑनलाइन प्रशिक्षणाला लाभतोय दणदणीत प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्लखांब या खेळाला कोरोना व लॉकडाऊनच्या काळातही दणदणीत प्रतिसाद लाभत आहे. युवा खेळाडू ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत. मल्लखांब करण्यासाठी लागणाऱ्या क्षमतेच्या पूर्वतयारीबाबतची सर्व माहिती ऑनलाइन दाखवण्यात येते. यामध्ये पोटांच्या स्नायूंची ताकद व हातातील ताकद कशी वाढवता येईल, मल्लखांबावरील बॅलन्स कसे काय करता येऊ शकेल. एकाग्रता, लवचिकता, स्टॅमिना या सर्व गोष्टी कशा मिळवता येतील याचेही मार्गदर्शन केले जाते. अदिती देशपांडे, निधी बेर्डे यांच्या टिप्स यावेळी कामी येत आहेत. तसेच घरी बसून खेळाडू डिप्रेशनमध्ये जाऊ नयेत, या कालावधीत ते मानसिकदृष्ट्या स्ट्राँग असायला हवेत यासाठी नीता ताटके यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. याप्रसंगी मल्लखांब या खेळाशी निगडित सर्व बाबींवर विश्व मल्लखांब संघटनेचे संस्थापक, संचालक आणि श्री समर्थ व्यायाम मंदिराचे मुख्य प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी प्रकाशझोत टाकला. मल्लखांबशी निगडित असलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणाला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान उदय देशपांडे भारावून गेले.

कोरोना व लॉकडाऊनमध्ये मल्लखांबचे मोठे नुकसान झाले. मार्च महिन्यात योगासन शिबिर, एप्रिल महिन्यात वासंतिक शिबिर, मे महिन्यात लाठीकाठी शिबिर, जून महिन्यात पावसाळी मल्लखांब शिबिर, जुलै महिन्यात एरीएल सिल्क शिबिर, ऑगस्ट महिन्यात ज्युडो शिबिर यांचे नित्यनियमाने आयोजन करण्यात येते. मात्र या वर्षी हे सर्व रद्द करण्यात आले. एवढेच नव्हे तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आमचा दहा जणांचा चमू जर्मनीला जाऊन मल्लखांबाचे प्रशिक्षण देतो. या वर्षी तेही होणार नाही, पण आम्ही जर्मनीतील युवकांना या खेळाचे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहोत, असे उदय देशपांडे यावेळी म्हणाले.

या खेळाला संसर्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येत आहेत का? असा सवाल केल्यानंतर उदय देशपांडे म्हणाले, मल्लखांब यामध्ये मॅन टू मॅन बॉडी कॉण्टॅक्ट होत नाही, पण एकाच मल्लखांबावर सर्व खेळाडूंना कसरती दाखवयाच्या असतात. त्यामुळे संसर्ग होण्याच धोका उद्भवतो. यामुळे आम्ही याची काळजी घेत आहोत. मल्लखांबपटूंना हाताला एरंडेल तेल लावून त्यामध्ये कापूर मिक्स करायला सांगण्यात येत आहे. तसेच मल्लखांबाला मॅग्नेशियम कॉर्बोनेट पावडर त्यामध्ये हळदीचा चुरा टावूâन लावण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखता येणार आहे. मल्लखांबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे कोरोनाचा संसर्ग कोणत्याही मल्लखांबपटूला झालेला दिसून येत नाही, असेही उदय देशपांडे यावेळी म्हणाले.

मुलाखती, व्हिडीओज अन् फोटोचा नजराणा

या लॉकडाऊनमध्ये मल्लखांब या खेळाशी निगडित असलेल्या बाबींना ऑनलाइन दणदणीत प्रतिसाद लाभलाय. पार्लेश्वर व्यायामशाळा, पुणे जिल्हा मल्लखांब संघटना, ठाणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्याकडून यूट्यूबवर राष्ट्रीय तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांच्या मुलाखती दाखवण्यात आल्या. यामुळे युवकांना प्रेरणा मिळाली. याशिवाय श्रेयस म्हसकर, वैभव पंत, स्वप्नील घेसे व अदिती देशपांडे यांच्या पुढाकाराने यूट्यूबवर जुन्या मुलाखती, व्हिडीओ, फोटो यांचा कार्यक्रम 15 जून या मल्लखांब दिनी दाखवण्यात आला. तसेच आशीष देवल व अभिषेक देवल यांच्या ‘मल्लखांब लव्ह’ या यूट्यूबवरील चॅनेलला उत्तम प्रतिसाद लाभतोय.

मल्लखांबपटूंची झेप

मल्लखांबपटूंना तसा रोजगाराचा प्रश्न सतावत नाही. केंद्र सरकारकडून स्कॉलरशिप मिळते. महाराष्ट्र सरकारच्या 5 टक्के कोट्यातही मल्लखांबपटूंना स्थान आहे. सिर्वâ दी सोले या जगप्रसिद्ध एण्टरटेन्मेण्ट वंâपनीत राजेश राव व कल्पेश जाधव हे मल्लखांबपटू आपल्या खेळाचे करतब दाखवतात. सहा मल्लखांबपटू गेली दोन वर्षे चीनमध्ये मल्लखांब प्रात्यक्षिकाच्या जोरावर चांगली कमाई करत आहेत.

आता या खेळातही ग्रेडेशन पद्धत

मल्लखांब या महाराष्ट्रातील खेळाचे परिपूर्ण शिक्षण घेणाNयांना आता सर्टिफिकेटही मिळणार आहे. मल्लखांबचा सहा लेव्हलचा कोर्स असणार आहे. पुढल्या मोसमात याची अंमलबजावणी होईल असा विश्वासही उदय देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केला.