आमदार किशोर जोरगेवार यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. या पत्रात त्यांना आणि कुटुंबियांना जीवे मारण्याचा इशारा असल्यानं मोठी खळबळ उडाली. अवैध दारूविक्रेत्यांनी ही धमकी दिली असल्याचा संशय आहे. अवैध दारुविक्री बंद करण्यासाठी आमदार करीत असलेल्या प्रयत्नांचा या पत्रात विरोध करण्यात आलाय. पत्र येताच आमदार जोरगेवारांनी पोलिसात तक्रार केली आहे. मागील काही दिवसात आमदार किशोर जोरगेवार यांनी अवैध दारूविक्री बंद व्हावी, यासाठी पोलिसांकडे निवेदनाचा सपाटा लावला होता, हे विशेष. पहिल्यांदाच अशाप्रकारची लोकप्रतिनिधींच्या धमकी आल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

28b51600-8a4f-46b5-9d35-bd0c8d1da2b4