
बीड जिल्ह्यात सुरूवातीपासुनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वडवणी तालुक्यासह जिल्ह्यात खरीप पिकांच तुफान आले आहे. मात्र त्याला नजर लागली असुन बहुतांश उसाचे पीक असलेल्या वडवणी तालुक्यात आज मंगळवारी सायंकाळच्या झालेल्या पावसाने हजारो हेक्टरवरील ऊस पीक जमीनदोस्त झाला आहे.
तालूक्यातील मामला, चिचोंटी,साळींबा, देवडी,काडिवडगाव,मोरेवाडी यासह दहा ते बारा गावात जोरदार पाऊस झाला नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. शेतात खचाचख पाणी साचल्याने सोयाबीन, कापुस, मुग यासारखे पिके पिवळी पडत आहेतच पण मुख्य म्हणजे उस पीक अक्षरशः जमीन दोस्त झाल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोमवार पाठोपाठ मंगळवारी ही जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने उभे पीक आडवे झाले आहे, वडवणी आणि कवडगाव महसूल मंडळात झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.




























































