नादच खुळा! चक्क कृत्रिम पद्धतीने अंडे उबवून कोब्रा जातीच्या सापाच्या 22 पिल्लांना दिले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुंदर नाईकवाडे | केज

साप किंवा नाग हा शब्द जरी ऐकला तरी कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहतो आणि दिसला तर बोबडीच वळते. पण केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील आकाश वैरागे आणि अक्षय वैरागे या दोन सर्पमित्रांनी नुकतेच कृत्रिम पद्धतीने अंडे उबवुन क्रोबा जातीच्या सापाच्या 22 पिल्लांना जिवदान दिले आणि त्यांना नैसर्गिक वातावरणात सोडले.

सर्पमित्र आकाश वैरागे व अक्षय वैरागे यांना धनेगाव येथून घरात साप असल्याचा फोन आल्यावर ते तात्काळ त्या ठिकाणी गेले. दोघे घटनास्थळी पोहोचूपर्यंत साप निघून गेला होता. पण त्यांनी घराच्या आजुबाजुला त्या सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र त्यांंना त्या ठिकाणी एका बिळात क्रोबा जातीच्या सापाची तब्बल 22 अंडी आढळुन आली. त्यांनी अंडी सुरक्षित आणि अलगदपणे बाहेर काढून घरी आणली. त्यानंतर कृत्रिम पद्धतीने उबवु दिली असता 3 ते 4 दिवसांपूर्वी त्या अंड्यांमधून 22 पिल्लांनी जन्म घेतला.

screenshot_2020-07-22-17-27-50-504_com-google-android-gm

सर्पमित्रांनी घेतलेल्या काळजीमुळे या अंड्यांना आणि पिल्लांना कुठलीही इजा झाली नाही आणि त्यांंच्यामुळे या 22 पिल्यांना जिवदान मिळाले. अखेर या पिल्लांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.