कोरोनामुळे आता क्रिकेट सामन्यांची कॉमेण्ट्री घरबसल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल स्पर्धेला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यास समालोचकांना घरामध्ये बसूनच कॉमेण्ट्री करावी लागणार आहे. स्टार इंडिया वाहिनीकडून हे पाऊल उचलण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 36 षटकांच्या सामन्यामध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. आता आयपीएलमध्येही त्याचाच अवलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

घरामध्ये बसून क्रिकेट लढतींचे समालोचन करण्याबाबत क्रिकेटपटू इरफान पठाणला विचारले असता तो म्हणाला, टेक्नॉलॉजीवर कोणाचेही कंट्रोल नसते. इंटरनेटचा स्पीड कमीजास्त होऊ शकतो. प्रत्येक क्षणाला टेन्शन असते. त्यामुळे लाईव्ह सामन्यादरम्यान काहीही होऊ शकते. आयपीएलमध्ये घरी बसून समालोचन करणे आव्हानात्मक असेल, असेही इरफान पठाण यावेळी म्हणाला.