मैत्र जिवाचे! मास्टर ब्लास्टर सचिन रमला बालपणीच्या आठवणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगात फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. आपल्या मित्रांच्या आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा देणारा हा खास दिवस असतो. म्हणूनच ‘मैत्र जिवाचे’ किस्से या दिवशी रंगताना दिसतात. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म रविवारी फ्रेंडशिप डेच्या संदेशाने भरून गेला. अशातच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची ट्विटरवरची पोस्ट लक्षवेधी ठरली आहे.


सचिनने बालपणीचा मित्रांसोबतचा फोटो अपलोड करून त्याला भावस्पर्शी कॅप्शन दिली आहे.  सच्चा दोस्त कसा असतो, हे सांगताना सचिननं मित्रांचा ‘स्टेडियमचे फ्लडलाइट’ असा उल्लेख केला आहे. सचिनच्या पोस्टमध्ये सहा मित्र दिसत आहेत. सगळे एका झोपाळ्यावर बसून मौजमस्ती करत आहेत. त्यांच्या मैत्रीचं वर्णन करताना सचिनने लिहिलंय, मित्र क्रिकेटच्या मैदानावरील फ्लडलाइटसारखे असतात. जे कोपर्‍यात बसून तुमचं यश बघतात. जेव्हा सूर्य मावळतीला जातो आणि प्रकाश कमी होतो, (जेव्हा तुम्हाला मित्राची जास्त गरज असते) तेव्हा ते चोहोबाजूला आपला प्रकाश पसरवतात. माझ्यासाठी प्रत्येक दिवस फ्रेंडशिप डे असतो! सचिनची फ्रेंडशिप डेची पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूप भावली असून ती मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.