
श्रीरंग खरे । मुंबई
कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी मराठी संशोधकांनी एन-100 मास्कची निर्मिती केली आहे. हा मास्क ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच संपूर्ण देशी बनावटीचा आहे. समित राऊत यांच्या ‘एक्सेल थ्रीडी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी’ कंपनीने या मास्कची निर्मिती केली आहे. त्यासाठीच्या संशोधनात लंडनमधील डॉ. राहुल गोरे यांनी मदत केली आहे. हा मास्क बनवणार्या जगभरात फक्त नऊ कंपन्या असून हिंदुस्थानातील ही पहिली कंपनी आहे. या मास्कच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे त्याचे पेटंट मिळवण्यासाठी आता कंपनीने धडपड सुरू केली आहे. या मास्कचे नाव ‘एक्सडी 100’ असे ठेवण्यात आले आहे.
‘एक्सडी 100’ मास्कमुळे मिळते 99.97 टक्के शुद्ध हवा मिळते असे या मास्कबाबत सखोल संशोधन करणार्या डॉ. राहुल गोरे यांनी सांगितले. या मास्कमध्ये फिल्टर हा मास्कमध्येच बसवलेला आहे असे त्यांनी सांगितले.
‘एक्सडी 100’ची वैशिष्टय़े
- हा मास्क हा कापडाचा नसल्याने तो धुतला तरीही त्याची क्षमता कमी होत नाही.
- या मास्कमधील फिल्टर बदलता येतो आणि एक फिल्टर दहा दिवस वापरता येतो. दिवसाला एक फिल्टर वापरल्यास विषाणूंपासून पूर्ण संरक्षण मिळू शकते.
- आरोग्य कर्मचार्यांव्यतिरिक्त केमिकल, फार्मास्युटीकल क्षेत्रातील लोकांसाठी किंवा धूळ आणि कणांचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी काम करणार्या लोकांसाठीही उपयुक्त
डीआरडीओने केलेल्या चाचणीचे निकाल आले आहेत. एफडीएकडून परवानगी मिळाली आहे. अमेरिकेच्या एफडीएकडूनही मान्यता मिळेल. एफएफपी3 गटात मान्यता मिळणारी हिंदुस्थानातील आमची पहिली कंपनी असू शकेल. – समित राऊत






























































