
मुंबईत मंगळवार, 4 आणि बुधवार, 5 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला असून अग्निशमन दल, एनडीआरएफची बचाव पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, मुंबईतील समुद्र किनारे, चौपाटय़ांवर जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

























































