IPL 2020 – क्रिकेट रसिकांची उत्कंठा वाढली; सामन्यांचे वेळापत्रक रविवारी जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटात आयपीएल क्रिकट सामन्यांबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, युएईमध्ये आयपीएल सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सामन्यांची तारीख जवळ आल्याने क्रिकेट रसिकांची समान्यांबाबतची उत्कंठा वाढली आहे. क्रिकेट रसिक आता सामन्यांच्या वेळापत्रकाची वाट बघत आहेत. या वेळापत्रकासाठी आणखी एक दिवस वाट बघावी लागणार आहे. आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती गवर्निंग काउंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी आयपीएल क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे क्रिकेट रसिक वेळापत्रकाची वाट बघत होते. मात्र, चेन्नई सुपरकिंग्ज संघातील 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वेळापत्रकात बदल करावे लागले आहेत. त्यामुळे आता सामन्यांचे वेळापत्रक रविवारी जाहीर होणार आहे. 13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. तसेच संध्याकाळी 8 वाजेएवजी 7.30 वाजताच सामने सुरू होणार आहेत.