इराणमध्ये शाळा सुरू, कोरोनापासून बचावासाठी लढवली ही शक्कल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
iran-schools

कोरोना विषाणूचा कहर ज्या देशांमध्ये दिसला त्या देशांपैकी एक असलेल्या इराणमध्ये सुमारे 7 महिन्यांनंतर शनिवारी पुन्हा शाळा उघडल्या. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता मात्र देशातील सर्वसाधरणपणे दीड कोटी मुले शाळेत परतली आहेत. परंतु ज्या भागात कमी संक्रमण आहे अशा ठिकाणीच हे शक्य झाले आहे. तसेच येथे अत्यंत कडक नियम करण्यात आले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक अट घालण्यात आली आहे की मुलांना विशिष्ट प्रकारच्या एका नेटमध्ये बसणे बंधनकारक आहे. आणि त्यांना त्याच पद्धतीने अभ्यास करावा लागेल.

काही शाळांमध्ये इराणी मुलांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खास डिझाइन केलेल्या जाळ्यामध्ये बसावे लागते जे सर्व बाजूंनी पूर्णपणे बंद आहे. प्रत्येक मुलासाठी एक वेगळे जाळे असते. इराणच्या रेड झोनमध्ये संक्रमणाचे प्रमाण विशेषत: जास्त आहे आणि तेथे शाळा बंद आहेत. तेहरानसह यलो झोनमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असला तरी ते रेड झोनच्या तुलनेत कमी आहे.

यलो झोनमध्ये आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही ते पालकांवर सोडले जाईल. जी मुले शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांना व्हर्च्युअल पद्धतीने शिकवले जाते. कोरोना विषाणूच्या भीतीने बर्‍याच कुटुंबांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नाही. इराणी प्रशासनाने व्हर्च्युअल अभ्यासासाठी कडक नियम लावले आहेत. या शाळा फक्त 35 मिनिटांसाठी शिकवतील. व्हर्च्युअल वर्ग केवळ सरकारी टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जातात.