ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमबीए प्रवेश प्रक्रिया होईल – उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच, एमबीए आणि एमएमएस 2020 ही सामाईक प्रवेश परीक्षा 14 व 15 मार्च 2020 रोजी घेण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल दिनांक 23 मे, 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

एमएएच, एमबीए आणि एमएमएस 2020 च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.