केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

‘मंगळवारी अशक्तपणा जाणवू लागल्याने मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी काही चाचण्या करायला सांगितल्या. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती सध्या चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रोटोकॉलचे पालन करावे. सुरक्षित रहा.’ असे गडकरी यांनी ट्विट केले आहे.