मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bombay-high-court-1

मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही न्यायाधीशांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे वय पन्नाशीच्या आसपास आहे. दोघांना मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका न्यायाधीशाला 1 ऑक्टोबर तर दुसर्‍या न्यायाधीशाला 6 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे कळाले.

न्यायालयात सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सुनावणी सुरू आहे. गेल्या महिन्यापसून नियमित सुनावणी सुरू झाली होती.