
केंद्रीय मंत्री व लोकजन शक्ती पार्टीचे नेते राम विलास पासवान यांचे आज दिल्लीतील रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांचा मुलगा व लोक जन शक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. राम विलास पासवान हे पाच दशकांपासून राजकारणात सक्रिय होते.
पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं।
Miss you Papa… pic.twitter.com/Qc9wF6Jl6Z— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 8, 2020
राम विलास पासवान यांना महिनाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या शनिवारी त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
राम विलास पासवान हे गेल्या पाच दशकापासून बिहार व देशाच्या राजकारणात सक्रिय होते. मात्र त्यांच्या आजारपणानंतर त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी पक्षाची धुरा स्वत:च्या हाती घेतली होती. पासवान यांनी व्ही. पी. सिंह, एचडी देवेगौडा, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग व नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्रीपद भुषवलं आहे. सध्याच्या केंद्र सरकारमध्ये ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते


























































