
निसर्गात आढळणाऱया जैवविविधतेचा शोध घेऊन तेजस ठाकरे नवनवीन प्रजाती जगासमोर आणत आहेत. खेकडे आणि पालींच्या दुर्मिळ प्रजातींच्या शोधानंतर सह्याद्रीच्या पुशीतील ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ ही माशाची प्रजात त्यांनी शोधली. आंतरराष्ट्रीय ‘अॅक्वा’ या जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाजप नेते आशीष शेलार यांनीही तेजस ठाकरे यांच्या या संशोधनाचे कौतुक करताना ‘निसर्गाच्या आविष्काराचे रंग जगासमोर आणून महाराष्ट्राची मान उंचावली!’ अशा शब्दांत त्यांना गौरविले आहे.
जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले..त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी “हिरण्यकेशी”प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट! https://t.co/CJu281Enwl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 17, 2020
‘शित्सुरा हिरण्यकेशी’ या सोनेरी केस असलेल्या माशाची चौथी प्रजाती तेजस ठाकरे यांच्या संशोधनानंतर जगासमोर आली. त्यांच्या या संशोधनाने निसर्गाची जैवविविधता जगासमोर येतानाच तिच्या संवर्धनासाठीही प्रयत्न होणार आहेत. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल कौतुक करताना भाजप नेते आशीष शेलार यांनी एक खास ट्विट केले आहे. आशीष शेलार या ट्विटमध्ये म्हणतात, ‘जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात आविष्काराचे रंग तेजस उद्धव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजात शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे. ग्रेट!’ विशेष म्हणजे तेजस ठाकरे यांचे कौतुक करताना दै. ‘सामना’मधील बातमी आपल्या अकाऊंटवर शेअर करीत तेजस ठाकरे यांचे कौतुक केले आहे. याआधीही पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध घेतल्यानंतर आशीष शेलार यांनी तेजस ठाकरे यांची या संशोधनाबद्दल स्तुती केली होती.


























































