
देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याची कबुली केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी दिली. समूह संसर्ग झाला असला तरी तो काही जिल्हा आणि राज्यांपुरताच मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘संडे संवाद’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही कबुली दिली. दाट लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काही भागांत समूह संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे. याचा अर्थ संपूर्ण देशभरात समूह संसर्ग झाला आहे, असे होत नाही. हे अनेक राज्यांच्या काही जिह्यांपर्यंतच मर्यादित असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.





























































