
गेल्या 29 दिवसांपासून सुरू असलेल्या अर्मिनिया आणि अजरबैजान या दोन देशांदरम्यान चाललेले युध्द थांबले आहे. दोन्ही देशात आज आजपासून युध्दविराम घोषित करण्यात आला. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमधील हे युद्ध थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी ही घोषणा केली आहे.
ट्रम्पकडून अभिनंदन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विट करून अर्मिनियाचे पंतप्रधान निकोलस पशिनान आणि अजरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्माह अलियेव यांचे अभिनंदन केले आहे.
Congratulations to Armenian Prime Minister Nikol Pashinyan and Azerbaijani President Ilham Aliyev, who just agreed to adhere to a cease fire effective at midnight. Many lives will be saved. Proud of my team @SecPompeo & Steve Biegun & @WHNSC for getting the deal done!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 25, 2020
दोन्ही देशांनी युध्द विराम देण्याबद्दल सहमती दर्शवल्याबद्दल ट्रम्प यांनी दोघांचे आभार मानले आहेत. यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील असेही ट्रम्प म्हणाले. यापूर्वी परराष्ट्र मंत्री पोम्पियो यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून संघर्ष विराम जाहीर केला होता.
नागोर्नो काराबाखवरून वाद
आर्मिनिया आणि अजरबैजान हे छोटे देश आहेत. दोघांमध्ये नागोर्नो काराबाख या जागेवरून एक महिना युद्ध सुरू होते. या भागात दोन्ही देशांचे जवळ जवळ 5 हजार लोक मारले गेल्याचे म्हटले जाते. त्यामुळे संपूर्ण जगाचे या दोन देशांवर लक्ष लागले होते.
अशांतता निर्माण
यापूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांवर अशांतता निर्माण केल्याचा आरोप केला होता. आर्मिनियाने अजेरी सैन्यावर नागरी भागात हल्ला केल्याचा आरोप केला होता. तर अजरबैजाने हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच संघर्ष विराम वर मान्यता देण्यापूर्वी आर्मिनियन सैन्याने मागे हटावे अशी मागणी केली होती.
आरोप प्रत्यारोप
तर दुसरीकडे नागोर्नो काराबाखच्या स्थानिक अधिकारी अजेरी सैन्यावर आरोप ठेवर आस्केरन आणि मार्टुनी भागात हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर अजबैजानने आपल्यावर रणगाडे, छोटे हत्यार आणि होवित्जर बंदुकांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
रशियाची मध्यस्थी
दोन्ही देशांमाध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी रशियानेही मध्यस्थी केली होती. पण दोन्ही देश मागे हटण्यास तयार नव्हते आणि युध्दाला सुरूवात झाली.




























































