राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांची चौकशी करा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या सेवेत कायम नियुक्ती देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार होत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशन ही केंद्र सरकारची योजना आहे. केंद्राच्या निधीतून राबवण्यात येणाऱया या योजनेची राज्य सरकारमार्फत अंमलबजावणी होते. त्यामुळे उमेदवारांच्या नियुक्त्या राज्य सरकार करते. या योजनेत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱयांना सेवेत कायमस्वरूपी नियुक्त्या देण्याच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या पत्रासोबत टेलिफोनवरील संवादाच्या तीन ऑडिओ क्लिप पत्रासोबत जोडल्या आहे. या ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार सुमारे 20 हजार उमेदवार राज्यात असून त्यांना सेवेत कायम करण्यासाठी एक लाख ते अडीच लाख रुपये गोळा केले जात आहेत. म्हणजे यासाठी 300 ते 400 कोटी रुपये जमवण्यात आल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी तक्रारीत केला आहे.