
सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे, तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला सीताफळाचे काही आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.
1) सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला शक्ती मिळते.
2) काळे, घनदाट केस कोणाला आवडत नाहीत. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा या समस्या वाढतात. हल्ली जगातील अनेक जण केसांशी संबंधित समस्याने त्रस्त आहेत. यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे सीताफळ. या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात.
3) सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते.
4) सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे. ह्याच्या नियमित सेवनामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात.
5) ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील, तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.
6) सीताफळाच्या पानांचा लेप फोडांवर लावल्यास ते ठीक होतात. अनेकांना तोंडावरील फोडाची समस्या असते त्यामुळे सीताफळाचा लेप खूप फायदेशीर ठरतो.
7) सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात व उवाही होत नाहीत.
8) उच्च रक्तदाब तसेच हद्यरोगाच्या पेशंटनी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते. रोज एक सीताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संकेत यांनी ही माहिती दिली.































































