
एकीकडे मुंबईची खरी लाईफ लाईन लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी अजूनही बंद असल्याने बेस्टवरच चाकरमान्यांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर पोहचविण्याची जबाबदारी पडली आहे. त्यामुळे बेस्टच्या गाडय़ांना मोठी गर्दी होत आहे. त्यातच चाकरमान्यांच्या मदतीला एसटीच्या एक हजार बसगाडय़ा भाडय़ाने घेतल्याने प्रवासी संख्या वाढत चालली आहे. सध्या दररोज बेस्टच्या बसमधून प्रवास करणाऱयांची संख्या 22 लाख 45 हजारांवर पोहोचली आहे.
8 जूनपासून बेस्टचा प्रवास सर्वसामान्यांना खुला करण्यात आला. त्याच्या आधी बेस्ट केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची वाहतूक करीत होती. बेस्टची प्रवासी संख्या सप्टेंबर महिन्यात 18 लाखांपर्यंत होती, परंतु बसेसला गर्दी वाढू लागल्याने बेस्टच्या मदतीला 24 सप्टेंबरपासून एसटी गाडय़ा दाखल होऊ लागल्या. बेस्टच्या ताफ्यात एक हजार एसटी गाडय़ा दाखल झाल्या आहेत. एसटी गाडय़ा दाखल होण्याआधी बेस्टची प्रवासी संख्या 17 लाख 73 हजार होती, परंतु हीच संख्या आता 22 लाख 45 हजार 676 झाली आहे. मुंबईकरांसाठी बेस्टच्या 3581 तर एसटीच्या एक हजार अशा



























































