
डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जॉर्जिया राज्यात मात केली आहे. ट्रम्प यांना नॉर्थ पॅरोलिना राज्यात विजय प्राप्त करता आला आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष निवडणूकीतील 538 इलेक्ट्रोरल व्होटसपैकी बायडन यांच्या इलेक्टोरल मतांची संख्या 306 झाली आहे.
त्यांनी ट्रम्प यांनी 2016 मध्ये हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात मिळविलेल्या 306 व्होटसची बरोबरी केली आहे. अमेरिकेच्या माध्यमांनी बायडन यांचा राष्ट्राध्य़क्ष निवडणूकीत विजय झाला असे जाहिर केले असले तरी त्याची अधिपृतरित्या निवडणूक यंत्रेणेकडून घोषणा 20 नोव्हेबरला केली जाईपर्यंत मतमोजणीचा गोंधळ सुरु राहिल असा अंदाज आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे इलेक्ट्रोरल मते मिळविण्यात खूप पिछाडीवर असले तरी त्यांनी अद्यापि पराभव स्विकारलेला नाही. वेगवेगळे कायदेशीर मुद्दे शोधून ते कोर्टात जात आहेत.


























































