50 मुलांचे केले लैंगिक शोषण, इंटरनेटवर अश्लील फोटो-व्हिडीओची करायचा विक्री; पोलिसांनी केले अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपी 10 वर्षांपासून लहान मूलनसोबत अश्लील कृत्य करत होता. हा नराधम लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओची इंटरनेटवर विक्रीही करत होता. मंगळवारी पोलिसांनी याप्रकरणाची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत 50 लहान मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. या मुलांचं वय 5 ते 16 वर्षाच्या दरम्यान आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या घराची तपासणी केली असता पोलिसांना 8 मोबाइल फोन, 8 लाख रुपये रोकड, सेक्स टॉयज, लॅपटॉप आणि इतर डिजिटल पुरावे सापडले आहेत. ज्यात मुलांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटोचा समावेश आहे.

आरोपी हा लहान मुलांना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवत होता. तो मुलांना मोबाईल व इतर वस्तू देऊन गप्प राहण्यास सांगत होता. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.