
मुंबईत कोरोना उतरणीला लागला असून चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह आढळणाऱया रुग्णांची सरासरी 5 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात चाचण्यांच्या तुलनेत कमी रुग्ण आढळत आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली.
मुंबईत 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर कोविडचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये घरोघरी तपासणी, स्क्रिनिंग, सर्वेक्षण, जनजागृती आणि उपचार यामुळे रुग्णसंख्येमध्ये घट होत आहे. गणेशोत्सव आणि दिवाळ सणामध्ये वाढलेली रुग्णसंख्या ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत पुन्हा नियंत्रणात आली आहे.
सोळा हजार चाचण्या, फक्त आठशे पॉझिटिव्ह!
z मुंबईत कोरोना वाढत असताना चाचण्यांची संख्या पाच हजारांवरून 15 ते 19 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळणाऱया रुग्णांची सरासरी 30 ते 35 टक्क्यांपर्यंत होती.
z मात्र आता पॉझिटिव्ह आढळणाऱया रुग्णांची सरासरी 4 डिसेंबर रोजी 5.03 टक्क्यांवर घसरली आहे. 4 डिसेंबर रोजी तब्बल 16 हजार 394 चाचण्या केल्यानंतर फक्त 825 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
z मुंबईत आतापर्यंत 19 लाख 55 हजार 342 चाचण्या करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत रुग्णवाढीचा दर 0.29 टक्क्यांवर आला असून सक्रिय रुग्ण 12 हजार 926 असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.





























































