मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय समिती 9 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीसंदर्भात पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणाऱया सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.

या समन्वय समितीमध्ये अॅड. आशीष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोळेगावकर आणि अॅड. अभिजित पाटील यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता होणाऱया सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक आणि संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्प साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य सरकारच्या वकिलांना माहिती देईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.