पुलवामात तीन दहशतवाद्यांचा खात्मा, बारामुल्लात ग्रेनेड हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मिरच्या पुलवामा जिह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला. हे तिघेही ’अल बद्र मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. दुसरीकडे बारामुल्ला जिह्यातील मुख्य बाजारात अज्ञात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यात महिला व मुलासह 6 नागरिक जखमी झाले. यातील हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

पुलवामाच्या टिकेन परिसरात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त खबर मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन राबवून नाकाबंदी केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला सडेतोड उत्तर देतानाच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी दिली होती. मात्र त्यांनी शरण न येता गोळीबार सुरूच ठेवला. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. क्रॉस फायरिंगदरम्यान एका नागरिकाच्या पायाला गोळी लागली. तसेच बारामुल्ला जिह्यातील पट्टनच्या सिंहपोरा परिसरातील ग्रेनेड हल्ल्यात 6 नागरिक जखमी झाले.