
केंद्र सरकारची देशाच्या कानकोपऱयात असलेली मालमत्ता म्हणजे खुली मैदाने, हॉल, रेस्ट हाऊस, गार्डन आता सर्वसामान्यांना लग्नसमारंभ, वेगवेळे सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी भाडय़ाने मिळणार आहेत. त्यासाठी कोणती मालमत्ता पुठे आहे, ती बुक आहे की नाही, त्याचे बुकिंग कसे करायचे याबाबतची इत्यंभूत माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी म्हणून स्वतंत्र वेब पोर्टल सुरु केले आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते www.esampedada.mohueda.gov.in हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावरून नागरिकांना सरकारी मालमत्तेची सध्यस्थिती समजणार आहे. वेब पोर्टलबरोबरच सरकारने केंद्राच्या मालमत्तांबाबत असलेल्या चार वेगवेगळय़ा संकेत स्थळावरील माहिती एकत्रित करून एम-आवास आणि एम-अशोका-5 ही दोन मोबाइल अॅप सुरू केली आहेत. येथे बुकिंगसह भाडय़ाचे पैसे देण्याची सुविधा असणार आहे.
वेब पोर्टलवर काय आहे
- केंद्र सरकारने सुरू केलेल्या वेब पोर्टलवर 40 ठिकाणी असलेल्या सरकारच्या एक लाख 9 हजारहून अधिक क्वार्टर उपलब्ध होणार आहेत.
- 28 ठिकाणी असलेल्या 45 कार्यालयांचा कॅम्पस आणि 1.25 कोटी वर्गफूट जागा मिळू शकणार आहे.
- 62 ठिकाणांवर असलेली 1176 हॉलिडे होम, सुट उपलब्ध आहेत.
- विज्ञान भवनासारखी ठिकाणेही बुकिंग करता येणार आहेत.




























































