देशातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयूव्ही येत आहे; ‘ही’ आहेत खास फीचर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. कमी मेंटेनन्ससह उत्कृष्ट ड्रायव्हिंगच्या अनुभवामुळे लोक आता या सेगमेंटमधील वाहनांना आपली पसंती देत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन अनेक वाहन उत्पादक कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही बनवण्याच्या दिशेने पुढे वाढत आहे. अशातच प्रसिद्ध फ्रेंच ऑटोमोबाईल निर्माता कंपनी Renault लवकरच हिंदुस्थानात आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही लॉन्च करणार आहे. Kiger असं या एसयूव्हीचे नाव कंपनीने ठेवले आहे. आज आपण याच एसयूव्ही बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

कंपनीने दावा केला आहे की Kiger लॉन्च झाल्यावर ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त एसयूव्ही असणार आहे. सध्या हिंदुस्थानात Nissan Magnite सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. ज्याची प्रारंभिक किंमत 4.99 लाख रुपये आहे. मात्र 1 जानेवारी 2021 पासून याच्या किंमतीत वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी Renault Kiger या एसयूव्हीला 5 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतसह हिंदुस्थानात लॉन्च करणार आहे.

इंजिन आणि फीचर्स

Kiger मध्ये कंपनी 1.0 लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन देऊ शकते. जे 72ps पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करेल. या व्यतिरिक्त यात 8 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह 7 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रूझ कंट्रोल, स्टीयरिंग माउंटंट कंट्रोल आणि व्हॉईस रिकग्निशन टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स देण्यात येऊ शकतात.