
थेट सौरऊर्जेवर चालेल अशी सोलर इलेक्ट्रिक कार अप्टेरा पॅराडियम ऑटो कंपनीने तयार केली आहे. या कारचे डिझाईन जेट फायटर विमानासारखे आहे. लाँचिंगपूर्वीच या सोलर पॉवर इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आहे. तिच्यात सूर्याची ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनची गरज भासणार नाही. साठवून ठेवलेल्या ऊर्जेच्या आधारे दिवसा-रात्री कार धावेल.




























































