
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीप्पणी केल्याप्रकरणी गो एअरच्या पायलटची हकालपट्टी करण्यात आली आहे. गो एअरच्या या सिनियर पायलटने सोशल मिडीयाद्वारे थेट पंतप्रधानांवर टीका केली होती. हे कंपनीच्या नियमाविरोधात असल्याचे सांगून या पायलटला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
दरम्यान नोकरीवरून काढून टाकल्यानंतर या पायलटने याप्रकरणी सोशल मिडीयावर माफी मागितली. तसेच हे माझे वैयक्तीक मत असून गो एअरचा त्याच्याशी संबंध नसल्याचेही म्हटले होते. 7 जानेवारीला पंतप्रधानांविरोधात सोशल मिडीयावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर गो एअरचे प्रबंधकांनी पायलटविरोधात कारवाई केली.


























































