
त्याच्या पहिल्याच चित्रपटातून त्याने करोडो मुलींच्या हृदयात स्थान मिळवले. डोळ्यात असलेली नजाकत, अभिनयात असलेली सहजता, निरागसता सगळ्यांनाच भावली तर त्याची नृत्याची अनोखी शैली त्याचं वेगळेपण. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आपला ‘द ग्रिक गॉड’ म्हणून प्रसिद्ध असलेला जगातील सर्वात सुंदर हिरोंमध्ये ओळखला जाणारा हृतिक रोशन आहे.

हृतिक रोशनच्या अभिनय आणि नृत्यशैलीचे अनेक चाहते आहेत. पण अनेकांना हे माहित नसेल की हृतिकला त्याचे करिअर करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याचे वडिल बॉलिवूडमध्ये असूनही त्याला अनेक खडतर प्रसंगांचा सामना करावा लागला. त्याच्या वाढदिवसानिमत्त त्याच्याबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी बघुयात. हृतिकने 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. खरंतर त्यांना या चित्रपटात काम करण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागले. हृ्तिक लहानपणापासूनच वडिलांसारखा अभिनेता होण्याचे तो स्वप्न पाहायचा. त्याला काम शिकवण्यासाठी वडिल राकेश रोशन यांनी चित्रपटाच्या सेट्सवर त्याला काम दिले होते.
चित्रपट क्षेत्राविषयी शिकण्यासाठी राकेश रोशन यांनी त्याला सहदिग्दर्शक म्हणून ठेवले होते. त्याने अनेक वर्ष आपल्या वडिलांसोबत काम केले. त्यावेळी अगदी सेटवर झाडू मारण्यापसून कलाकारांना चहा देण्यापर्यंत त्याने काम केलेले आहे. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्याला छोट्या छोट्या गोष्टी समजायला हव्यात. हृतिक रोशनने वडिलांनी बनवलेल्या ‘करण-अर्जुन’ चित्रपटासाठी सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. एका मुलाखतीत राकेश रोशन यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांना सांगितले आयुष्यात आपल्या वडिलांनी किती कष्ट केले याची जाणीव त्याला व्हावी. मी पण सहदिग्दर्शक म्हणून सुरुवातीच्या काळात काम केले आहे. कॅमेऱ्याच्या मागे आणि सेट्सवर काय असतं. लोकं काय बोलतात हे समजायला हवं.
हृतिक सहा वर्षांचा असताना त्याने आशा या चित्रपटात त्याचे आजोबा ओम प्रकाश यांच्यासोबत काम केले. तेव्हा तो सहा वर्षांचा होता. त्याच्या मोबदल्यात त्याला 100 रुपये दिले होते. ती त्याची पहिली कमाई होती. आज हाच हृतिक रोशन सुपरस्टार आहे. लाखो-करोडो त्याचे चाहते आहेत. त्याने कहो ना प्यार है, अग्निपथ, धूम-२, जोधा-अकबर असे अनेक सुपरहीट चित्रपट केले.






























































