वीजप्रवाह उतरल्याने पेटलेल्या बसमधील सहा प्रवासी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्त्यावर तुटलेली वीज तार बाजूला करताना वीजप्रवाह बसमध्ये उतरल्याने पेटलेल्या बसमध्ये सहा प्रवासी होरपळून ठार झाले, तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना राजस्थानच्या जालोर जिह्यातील महेशपुरा गावात रात्री उशिरा घटली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जोधपूरच्या एमडीएम रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजस्थानच्या जालोर जिल्हय़ातील महेशपूर गावात रात्री उशिरा प्रवाशांनी भरलेली बस रस्ता चुकल्याने दुसऱया गावात गेली. या ठिकाणी रस्त्यावर विजेची तार तुटल्याचे लक्षात आल्यावर ड्रायव्हरने बस थांबविली. यातील क्लिनरने बसवर चढून काठीने वीज तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान विजेची तार क्लिनरच्या गळ्य़ाला लागल्याने बसमध्ये वीजप्रवाह पसरला. त्यामुळे बसने क्षणातच पेट घेतल्याने होरपळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर 6 जण जखमी झाले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या बसच्या मागे आणखी एक बस होती. परंतु या बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.