
पहिल्या पर्वाच्या यशानंतर रेडिओ सिटी रेडिओ नेटवर्क हिटलिस्ट ओटीटी अवॉर्डसचे दुसरे पर्व सादर करण्यास सज्ज आहे. सर्वात विश्वसनीय लिसनर चॉईस अवॉर्ड ओटीटी व्यासपीठांवरील सर्वोत्तम प्रतिभा व कंटेन्टला सन्मानित करतो. याकरिता वोटिंग प्रक्रिया सुरू झाली असून 9 फेब्रुवारीपर्यंत वोटिंग करता येईल. प्रेक्षक 14 विभागांमधून त्यांच्या आवडत्या प्रतिभेची निवड करू शकतील. विजेत्यांची घोषणा 14 फेब्रुवारीला करण्यात येईल. www.hitlistottawards.com येथे लॉग इन करत वोटिंग करता येईल.




























































