
जालना संभाजीनगर महामार्गावर दावलवाडी फाटा येथे आज 29 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भरधाव कंन्टेनरच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन युवक जागीच ठार झाल्याचा भीषण घटना घडली. दरम्यान यावेळी वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. यात अक्षय सारंगधर जाधव, वैभव दत्तात्रय चव्हाण दोघे. रा. दावलवाडी ता.बदनापूर, जि.जालना असे नावे आहेत.
जालना- संभाजीनगर महामार्गावर जालनाकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्य़ा कंन्टेनरने क्र. (एम. एच. 21 बी. एच. 3316) दावलवाडी येथील मोटारसायकल क्र. (एम. एच. 21 बी. सी. 560) जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार अक्षय सारंगधर जाधव (21), वैभव दत्तात्र्य चव्हाण (20) रा. दोघे दावलवाडी ता. बदनापूर, जि.जालना) हे दोन युवक जागीच ठार झाले असून शेलगाव येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. या घटनेची माहीती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील, पोलिस जमादार गजानन जारवाल, आय. जी. शेख, डोईफोडे, बुनगे, घोडके, काळूसे, वाहनचालक शिवाजी भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून दोन्ही युवकांना शेलगाव येथील प्राथामिक आरोग्य केन्द्रात शवविच्छेदनासाठी पाठवून सदरील कंन्टेनरने ताब्यात घेवून बदनापूर पोलीस ठाण्यात लावण्यात येऊन वाहतूक सुरळीत केली.



























































