मोदी सरकार फक्त घोषणांच्या बळावर जगलेले, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोटाबंदीपासून देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली आहे. या घसरणीला मोदी सरकार जबाबदार असून मोदी सरकार म्हणजे केवळ घोषणांच्या बळावर जगलेले हिंदुस्थानच्या इतिहासातील एकमेव सरकार असल्याची खरमरीत टीका ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.

यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. सोमवारी जाहीर करण्यात येणाऱया केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल अशी कोणतीही ठोस तरतूद असण्याची शक्यता नसल्याचे मत डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केले. सलग तीन वर्षे आर्थिक वृद्धीचा दर उणे असणारा हिंदुस्थान हा एकमेव देश असल्याचे ते म्हणाले. देशाची क्रयशक्ती वाढण्यासाठीही सरकारने काहीही केलेले नसून मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गंभीर नसल्याचे मत यावेळी डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केले.

अण्णा हास्यास्पद व्यक्तिमत्त्व
अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व असल्याचे मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत. अण्णांचे बोलविते धनी आता समोर आले असून अण्णा विश्वास न ठेवण्याजोगे आणि मॅनेजेबल असल्याचा घणाघातही मुणगेकर यांनी यावेळी केला.